Mon, Apr 22, 2019 06:22होमपेज › Belgaon › कुद्रेमानी साहित्य संमेलन तयारीला वेग

कुद्रेमानी साहित्य संमेलन तयारीला वेग

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 8:33PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बलभीम साहित्य संघ व कुद्रेमानी ग्रामस्थ आयोजित बारावे मराठी साहित्य संमेलन 7 जानेवारी रोेजी होणार आहे. या संमेलनाची तयारी जोमाने सुरू असून यामध्ये कार्यकर्ते गुंतले आहेत.
कुद्रेमानी येथील साहित्य संघाच्यावतीने मागील 11 वर्षापासून संमेलन आयोजन करण्यात येते. यावर्षीही दर्जेदार संमेलनाचे आयोजन करण्याचे प्रयत्न संयोजकांच्यावतीने करण्यात येत आहेत. यासाठी बलभीम वाचनालयात बैठका आयोजित करण्यात येत असून यामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.

संमेलनात ग्रंथदिंडी, अध्यक्षीय भाषण, कविसंमेलन, कथाकथन व प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या जबाबदार्‍या देण्यात आल्या असून त्यानुसार कामाची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार तयारी सुरू आहे. संमेलनापूर्वी संमेलनपूरक उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी, रसिक यांना सामावून घेण्यात येणार आहे. कुद्रेमानी प्राथमिक शाळेचा शतकमहोत्सव कार्यक्रम 23, 24 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याचीही जोमाने तयारी करण्यात येत आहे. यासाठी माजी विद्यार्थी सक्रिय झाले असून दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

सध्या साहित्य संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी मोहन शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी रवी पाटील व विशाल गुरव यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना कार्यकारिणामध्ये सामावून घेण्यात आले आहे. यामुळे कामाला गती आली आहे. यामुळे गावात वातावरण निर्मिती झाली आहे.