Tue, Mar 19, 2019 20:25होमपेज › Belgaon › अथणी तालुक्यातील अपहृत मुलगी मिरजेत आढळली 

अथणी तालुक्यातील अपहृत मुलगी मिरजेत आढळली 

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 10:46PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी      

कोकटनूर (ता.अथणी) येथील रेणुकादेवी यात्रेतून बेपत्ता झालेली बळवाड येथील अल्पवयीन तरुणी मिरज रेल्वेस्थानकावर मंगळवारी दुपारी आढळून आली. अथणी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळात दाखल केले  आहे. बळवाड येथील अल्पवयीन तरुणी 15 दिवसांपूर्वी कोकटनूर येथे रेणुकादेवी यात्रेला गेली होती. ती यात्रेत देवदर्शन करून घरी आली नाही. यात्रेतून तिचे अपहरण झाले होते.

यात्रेला गेलेली आपली मुलगी घरी परत न तिच्या वडिलांनी अथणी पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. अथणी पोलिसांनी तिचा शोध चालविलेला असताना ती मिरज येथे असल्याचे समजून आले. पोलिसांनी मंगळवारी मिरजेत तिला ताब्यात घेतले. बळवाड येथीलच अमित नामक तरुणाने (वय 21) आपले अपहरण केले होते. त्याने आपणाला मिरजेला सोडून पळ काढल्याचे भेदरलेल्या अवस्थेत पोलिसांना  सांगितले. पोलिसांनी तिच्या पालकांशी संपर्क साधून मुलगी मिळाल्याचे कळविले आहे.