होमपेज › Belgaon › बेळगाव, खानापुरात एसीबी छापे

बेळगाव, खानापुरात एसीबी छापे

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 14 2017 12:19AM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी  

सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कार्यरत असलेले सहायक कार्यकारी अभियंता सुरेश एस. भीमनायक यांच्या मालमत्तांवर छापे घालून कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केला आहे. बेळगाव, खानापूरसह एकूण सहा ठिकाणी भीमनायकच्या मालमत्तांवर बुधवारी पहाटे एसीबीचे उपअधीक्षक जे. रघू यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

बेळगावमधील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणार्‍या कित्तूरमध्ये भीमनायक  सहायक कार्यकारी अभियंतापदावर कार्यरत आहेत. त्यांनी बेकायदा पद्धतीने उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याचा संशयावरून जे. रघू यांच्या नेतृत्वाखाली सहाजणांच्या पथकाने छापे टाकले. 

बेळगावमधील माळमारुती, तसेच खानापूर व कित्तूरमधील निवासस्थान  आणि कार्यालयाची एसीबीने झडती घेतली. खानापूरमधील फार्म हाऊस, हनुमाननगर येथील 1,700 चौरस फूट जागा, ळमारुती येथील शेतजमीन, फार्म हाऊस येथेही छापा टाकला. अन्य ठिकाणच्या बेकायदा मालमत्तेची कागदपत्रे आणि सोन्या, चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. नातेवाइकांवरही छापे भीमनायक यांच्या नातेवाइकांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. बंगळूरमधून एसीबीचे पोलिस महासंचालक शरदचंद्र यांनीही छाप्यांची माहिती दिली.