Wed, Apr 24, 2019 19:58होमपेज › Belgaon › बुधवारी खग्रास चंद्रग्रहण 

बुधवारी खग्रास चंद्रग्रहण 

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 28 2018 8:35PMबेळगाव : प्रतिनिधी    

 यात्रेचा मास म्हणून ओळखल्या जाणार्‍या माघ महिन्यातील पंधरवडा सरत आला असून माघी यात्रांना सुरुवात झाली आहे. बुधवार दि.31 रोजी पौर्णिमा आहे. उत्तर कर्नाटकातील प्रमुख देवस्थानांपैकी एक असलेल्या सौंदत्ती रेणुकादेवीची यात्रा होणार आहे.  या पौर्णिमेला माही पौर्णिमा म्हटले आहे. हिटणी (ता. हुक्केरी) येथील म्हसोबाची यात्राही पौर्णिमेला होणार आहे. मंगळवार दि. 30 रोजी रात्री 10.23 मि. ने पोैर्णिमा सुरू होत असून दि.31 रोजी सायंकाळी  6.57 पर्यंत पौर्णिमा असेल. बुधवारी  खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. ते भारतातून दिसणार आहे. खग्रास स्थितीतच चंद्रोदय होणार असल्याने ग्रहणाला ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण असे म्हटले आहे. ग्रहण अमेरिका, रशिया, आशिया मध्य व पूर्व तसेच युरोप खंडाच्या पूर्व भागातून दिसणार आहे. 

ग्रहणाचा वेधारंभ बुधवारी 

सूर्योदयापासून सुरू होईल. सायंकाळी 5.18 वा. ग्रहणाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 6.21 वा. चंद्राच्या  खग्रास स्थितीला प्रारंभ होईल व 8.42 वा. ग्रहणाची समाप्ती होईल.
ग्रहणाचे राशीपरत्वे फल   वृषभ, कन्या, तूळ, कुंभ या राशींना शुभ. मिथुन, वृश्चिक, मकर, मीन राशींना मिश्र. मेष, कर्क, सिंह, धनु या राशींना अनिष्ट फळ आहे. खग्रास स्थितीकाळात अन्न? पाणी सेवन वर्ज्य करावे. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून अन्न? पाणी सेवन करावे. ग्रहण वेधारंभ काळात जप, तप, ध्यानधारणा, नामस्मरण, भजन केल्यास हिताचे होईल. अनिष्ट फळ असणार्‍या राशीच्या नागरिकांनी ग्रहणासंबंधीचे नियम काटेकोरपाळणे आवश्यक असल्याचे पुरोहित सांगतात.