होमपेज › Belgaon › उत्तर कर्नाटकाला ठेंगा, सुवर्णसौध देखभालीवर ८ कोटी खर्च

उत्तर कर्नाटकाला ठेंगा, सुवर्णसौध देखभालीवर ८ कोटी खर्च

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

सरकारने उत्तर कर्नाटकाच्या विकासाला चालना व सीमाभाग कायमस्वरूपी कर्नाटकात राहण्याच्या दृष्टीने बेळगाव येथे सुवर्ण विधानसौधची निर्मिती केली. उत्तर कर्नाटकाच्या विकासाला चालना देण्याचे सरकारचे ते आश्‍वासन फोल ठरले आहे. परंतु सुवर्ण विधानसौधच्या देखभालीवर सरकारने 8 कोटी 95 हजार रुपयांचा खर्च केला आहे.
सुवर्ण विधानसौधच्या उद्घाटन समारंभावर सरकारने 4 कोटी 62 लाख 27 हजार रुपयांचा खर्च केला आहे.

एप्रिल 2017 पर्यंत विद्युत बिलावर 3 कोटी 38 लाख 68 हजार रुपयांचा खर्च केला आहे. सुवर्ण विधानसौधच्या बांधकामासाठी 500 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. परंतु इतकी रक्कमसुध्दा उत्तर कर्नाटकाच्या विकासावर खर्च केली गेली नाही, असा आरोप माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केला आहे.कर्नाटक सरकार विकासाच्या नावाखाली जनतेकडून कररूपाने गोळा केलेला कोट्यवधी रुपयांचा वारेमाप खर्च करत असल्याची टीकाही गडाद यांनी केली आहे.