Wed, Jul 24, 2019 06:12होमपेज › Belgaon › कपिलेश्‍वर कॉलनीत घरफोडी; पाच लाखांचा ऐवज लंपास

कपिलेश्‍वर कॉलनीत घरफोडी; पाच लाखांचा ऐवज लंपास

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:33PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

दंगलीचे सावट कमी झाल्यानंतर चोरट्यांनी पुन्हा आपल्या कारनाम्यांना शहरात सुरुवात केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री कपिलेश्‍वर कॉलनीत कुलूपबंद घर फोडून चोरट्यांनी 5 लाखांचा ऐवज लंपास केला.  कपिलेश्‍वर कॉलनीतील सिद्धविनायक मंदिरासमोरील गल्लीत  कावेटिया यांच्या इमारतीत कावेटिया कुटुंबीय राहतात. शुक्रवारी हे कुटुंब घर बंद करून बाहेर गेले होते. चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस कुलूप तोडून घरातील दोन कपाटे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व अन्य किमती साहित्य घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. 

शनिवारी सकाळी चोरी उघडकीस आली. त्यानंतर मार्केट पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच 5 लाखांचा ऐवज चोरी झाल्याची माहिती दिली. मात्र, हद्दीच्या वादामुळे तक्रार कोणत्या पोलिस स्टेशनमध्ये नोंदवायची, असा प्रश्‍न उपस्थित करून पोलिसांनी सायंकाळपर्यंत तक्रार नोंदवून घेतली नव्हती. कपिलेश्‍वर कॉलनी परिसर मार्केट आणि खडेबाजार अशा दोन पोलिस ठाण्याच्या हद्दीत विभागला गेला आहे. या चोरीबाबतही हाच प्रकार घडला आहे. रात्री उशिरा तक्रार नोंदवून घेऊ, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली.