होमपेज › Belgaon › कामत गल्ली दंगलीतील  १७ जणांना जामीन मंजूर

कामत गल्ली दंगलीतील  १७ जणांना जामीन मंजूर

Published On: Dec 13 2017 1:53AM | Last Updated: Dec 13 2017 1:53AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी  

कामत गल्ली येथे झालेल्या दगडफेकप्रकरणी 17 जणांना येथील  मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जे. सतीशसिंग यांनी सशर्त जामीन मंजूर केला. यामध्ये शिवाजी कुट्रे, आशुतोष भातकांडे, अभिजीत भातकांडे, संजय जाधव, उज्ज्वल भातकांडे, राजू सदावर, सौरभ किल्लेदार रा.कामत गल्ली यांचा समावेश आहे. दुसर्‍या गटातील बद्रुद्दिन बेपारी, वाहिब बेपारी, तौसिफ बेपारी, सलीम बेपारी, आसिफ बेपारी, ताहिब बेपारी, महंमदगौस बेपारी, आश्रफखान पठाण, नासिर पठाण, अब्दुल गणिवाले पारिश्‍वाड रा.कसाई गल्ली यांचा समावेश आहे. 

मार्केट पोलिसांनी या सर्व जणांवर भा.दं.वि. 143, 147, 148, 307, 427, 279 सहकलम 149 कलमाखाली गुन्हा नोंद करून खटला दाखल केला आहे. या सर्वांना प्रत्येकी 50 हजार रु.ची वैयक्तिक हमी व तितक्याच रमकेचा जामीन, पुन्हा समान गुन्हा करू नये, साक्षीदारांना धमकावू नये, तपास अधिकार्‍याला सहकार्य करावे, या अटींवर न्या. आर.जे. सतीशसिंग यांनी जामीन मंजूर केला.
या आरोपींच्या एका गटातर्फे अ‍ॅड.प्रताप यादव तर दुसर्‍या गटातर्फे अ‍ॅड. जहीर अब्बास हत्तरगी हे काम पाहत आहेत.