Thu, Apr 25, 2019 11:44होमपेज › Belgaon › कडोलीत उद्या साहित्याचा जागर

कडोलीत उद्या साहित्याचा जागर

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 13 2018 12:18AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 14 रोजी पार पडणार आहे. संमेलनात दरवर्षीप्रमाणे नामवंत साहित्यिकांची मांदियाळी असणार आहे. स्वामी विवेकानंदनगरीत प्राथमिक मराठी शाळेसमोर रंगणार्‍या या संमेलनाला साहित्यिक, कवी उपस्थित राहणार आहेत. पाच सत्रात हे संमेलन पार पडणार आहे.  ज्ञानेश्वर मुळे (संमेलनाध्यक्ष) ज्ञानेश्वर मुळे हे केंद्रीय सचिव असून नामवंत लेखक, स्तंभलेखक आहेत. सध्या ते केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत आहेत. 1983 साली ते भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले. आतापर्यंत त्यांनी 15 पुस्तके लिहिली आहेत. माती, पंख आणि आकाश हे त्यांचे गाजलेले लेखन. मालदिव, युएसए, न्यूयॉर्क याठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. 

सुधीर दरेकर (संमेलन उद्घाटक) सुधीर दरेकर यांनी लिंगराज महाविद्यालय बेळगाव येथून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. प्रसिद्ध उद्योगपती म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 
डॉ. सुभाष धोंडिराम माने  (व्यासपीठ उद्घाटक) डॉ. सुभाष धोंडिराम माने (रा.कुंभारवाडी, रेणापूर, जि. लातूर) यांनी एमएस्सी, पीएचडी(रसायनशास्त्र), एलएलबीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. लातूर येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयात 1080-82 पर्यंत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1982 साली क्‍लासवन पदावर डीडीआर (सहकार) निवड. 2012 साली अपर सहकार आयुक्तपदी पदोन्नती. 2014 मध्ये ते सेवानिवृत्त झाले.  सौरभ कर्डे (व्याख्याते) सौरभ कर्डे (पुणे) यांनी यापूर्वी शिवरायांचा आठवावा प्रताप, धर्मवीर शंभूराजे, लव्ह जिहाद, नवे धर्मसंकट आदी विषयांवर व्याख्याने दिली आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा पुरस्कार तसेच इतर विशेष पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 

दीपक गायकवाड (कथाकथनकार) दीपक गायकवाड (मु. रुकडे. ता. हातकणंगले) यांचा बाभळीच्या गावा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. ते राज्यस्तरीय काव्यसरी समूहाचे अध्यक्ष-संघटक आहेत. 300 पेक्षा अधिक साहित्य संमेलनात निमंत्रित कवी व कथाकथनकार म्हणून सहभाग. व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन कार्यक्रम केले आहेत.  शिवाजी बंडगर  (कवी) शिवाजी बंडगर (ता.सांगोला, जि. सोलापूर) यांच्या ग्रामीण कथा व दिवाळी अंकातून लेखन प्रसिद्ध झाले आहे. अनेक साहित्य संमेलनात सहभाग. मुलांसाठी आनंदमेळा स्वतंत्र कार्यक्रम. अनेक पुरस्कारांनी गौरव.  अंकुश आरेकर (कवी) अंकुश आरेकर (मु. भांबेवाडी, ता.मोहोळ, जि. सोलापूर, सध्या ः पुणे) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एमएचे शिक्षण घेत आहेत. युवा कवी पुरस्काराने गौरव. गदिमांचे वारसदार म्हणून सन्मान.  ज्ञानेश डोंगर (कवी) ज्ञानेश डोंगरे (चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांचा ढीगाळ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पुरस्काराचे मानकरी. राज्य शेतकरी साहित्य इर्जिक परिषदेच्या सचिव पदावर  कार्यरत.