Tue, May 21, 2019 18:50होमपेज › Belgaon › फेरीवाल्यांकडून वाढीव शुल्क आकारणार

फेरीवाल्यांकडून वाढीव शुल्क आकारणार

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 30 2017 12:19AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी  

शहरातील फेरीवाले, भेळपुरी, भाजीविक्रेते, फळविक्रेते व इतर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांकडून 10 रुपये, 50 रुपये व 100 रु. याप्रमाणे भूभाडे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला.  अनगोळ येथील बिग बाजारसमोर मनपाची जागा आहे. त्याठिकाणी फूडकोर्ट व एसपीएम रोडवरील मनपाच्या एका जागेवर फूडकोर्ट करण्याचा निर्णय मनपा बैठकीत घेण्यात आला. शिवाजीनगरामध्ये रिमांड होमजवळ असलेल्या जागेवर   उद्यानाची निर्मिती करावी, अशी मागणी नगरसेविका मीनाक्षी चिगरे यांनी केली आहे. त्याबद्दलची फाईल गेल्या 4 वर्षांपासून हरवली असल्याचे अधिकारी सांगत आहेत. सदर उद्यान करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी चिगरे यानी  उपोषण करण्याचा इशारा दिला होता.  

गणपत गल्ली, मारुती गल्ली व खडेबाजार, समादेवी गल्ली आदी बाजारपेठेच्या ठिकाणी सम?विषम पध्दतीने रहदारी नियंत्रण पोलिसांनी पार्किंगची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांची व महिलावर्गाची चांगली सोय झाल्याबद्दल नगरसेविका माया कडोलकर यांनी मनपा अधिकारी, रहदारी नियंत्रण पोलिसांचे अभिनंदन करण्याचा ठराव मांडला व त्याला सभागृहाने मंजुरी दिली. शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर योग्यप्रकारे मार्किंग करून रहादारीची कोंडी होणार नाही, अशी व्यवस्था करण्याचा आदेश महापौरांनी पोलिसांना बजावला आहे. शहापूर भाजी

मार्केटची जागा रिकामीच आहे. त्या ठिकाणी भाजी विक्रेत्यांची सोय केल्यास रस्त्यावरील अडथळे दूर होऊ शकतील, अशी सूचनाही नगरसेवकांनी केली. प्रारंभी, नगरसेवक विजय पाटील यांच्या मातोश्री सुशीला पाटील यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करून त्याना श्रध्दांजली वाहिली. सत्ताधारी गटनेते पंढरी परब, माजी महापौर किरण सायनाक, दीपक जमखंडी, सरला हेरेकर,  रमेश सोंटक्की, राकेश पलंगे, वैशाली हुलजी, राजू बिर्जे, अनंत देशपांडे, डॉ. दिनेश नाशिपुडी, अ‍ॅड.रतन मासेकर व इतरांनी चर्चेमध्ये भाग घेतला.