Wed, Jul 24, 2019 12:24होमपेज › Belgaon › मुहूर्त कमी....करा लगीनघाई

मुहूर्त कमी....करा लगीनघाई

Published On: Dec 30 2017 12:34AM | Last Updated: Dec 29 2017 9:11PM

बुकमार्क करा
 बेळगाव ः प्रतिनिधी

नवीन वर्षात विवाह इच्छुकांना विवाहमुहूर्तासाठी थोडी धावपळ करावी लागणार आहे. जानेवारी, ऑगष्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यात एकही विवाह मुहूर्त नाही. यामुळे लग्नाची घाई करा असे म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र, चांगला दिवस पाहून अनेक पालक विवाह उरकुन घेण्याच्या तयारीतही दिसत आहेत. भारतात शुभ मुहूर्तावर लग्न करण्याची प्रथा आहे. जोपर्यंत शुभ मुहूर्त निघत नाहीत. तोपर्यंत विवाह पार पडत नाहीत. त्यातच पुढील वर्षी पाच महिने विवाहाचा मुहूर्त नाही. यामुळे यंदा जरा घाईच करावी लागणार आहे. 

यंदाच्या लग्नसराईला सुरुवात झाली असून इच्छुकांनी लग्नाची घाईगडबडही चालविली आहे. अनेक जणांनी लग्नाची तारीख देखील निश्‍चित केली आहे. यासाठी बाजारात खरेदीची धूम उडत आहे. कपडे, भांडी इतर साहित्य खरेदीसाठी वधू-वराच्या घरच्यांनी गर्दी केली आहे. जानेवारी 2018 मध्ये शुक्रअस्तामुळे विवाह मुहूर्त नाहीत. फेब्रुवारी 2018 मध्ये 8, मार्चमध्ये 7, एप्रिलमध्ये 8, मे मध्ये 9, जून मध्ये 4, जुलै महिन्यात 6 विवाह मुहूर्त आहेत. तसेच ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात विवाहमुहूर्त नाहीत. तसेच डिसेंबर महिन्यात 10 मुहूर्त आहेत. 

15 डिसेंबर 2017 ते 1 फेब्रुवारी 2018 पर्यंत शुक्र ग्रहाचा अस्त आहे. 16 मे ते 13 जूनपर्यंत ज्येष्ठ अधिकमास आहे. 26 जुलै ते 20 नोव्हेंबरपर्यंत चार्तूमास आहे. तसेच 15 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत गुरु ग्रहाचा अस्त आहे. यामुळे या काळात विवाहमुहूर्त नाहीत. यंदा विवाहमुहूर्त कमी असल्याने लग्नासाठी हॉल मिळणे अडचणीचे ठरते. अनेक ठिकाणी हॉल आधिच बुकींग झालेले आहेत. त्यामुळे यंदा लग्नाची गडबड करावी लागणार आहे. 

 नवीन वर्षात तीन सुर्यग्रहणे व दोन चंद्रग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे होणार आहेत. यातील दोन खग्रास चंद्रग्रहणे 31 जानेवारी व 27 जुलै या दिवशी भारतातून दिसणार आहेत. तसेच दोन पोर्णिमा येणार आहेत. या वर्षात सुवर्ण खरेदीसाठी तीन गुरुपुष्पयोग आले असून 9 ऑगस्ट, 5 सप्टेंबर आणि 4 आक्टोंबर या दिवशी तो लाभ घेता येईल. गणेशभक्तांसाठी 3 एप्रिल, 31 जुलै व 25 डिसेंबर अशा तीन अंगारकी चतुर्थी येत आहेत.  

- छत्रे गुरुजी , अनसुरकर गल्ली

पंचागानुसार पुढील वर्षी 16 मे ते 13 जून दरम्यान ज्येष्ठ अधिक महिना आहे. त्यामुळे या काळात विवाह तिथी नाही. तसेच शुक्र अस्त असल्यामुळे मुर्हूत फार कमी आहेत. यामुळे इच्छुकांना गडबड करावी लागणार आहे.