Tue, May 21, 2019 23:12होमपेज › Belgaon › शहरात आजपासून हेल्मेटसक्‍ती

शहरात आजपासून हेल्मेटसक्‍ती

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 21 2018 11:51PMबेळगाव :प्रतिनिधी
 

दुचाकीस्वारांच्या हेल्मेटसक्‍तीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बजावला आहे.त्या आदेशाची बेळगाव शहरात सोमवारपासून अंमलबजावणी होणार आहे. त्याचबरोरबर 27 जानेवारीपासून उत्तर कर्नाटकातील प्रत्येक जिल्ह्यात हेल्मेटसक्‍ती सुरू होणार आहे. हेल्मेटसक्‍तीचा आदेश संपूर्ण राज्यांसाठी अनिवार्य आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे पोलिस आयुक्‍त राजप्पा यांनी सांगितले. हेल्मटसक्‍तीबरोबरच सिट बेल्टचा वापर न करणारे, अतिवेगाने वाहन हाकणारे, मद्यप्राशन करून वाहन चालवणारे यांच्या विरोधातही कडक कारवाईचे संकेत राजप्पा यांनी दिले आहेत. दुचाकीस्वारांनी आयएसआय दर्जाचे हेल्मेट वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, बेळगाव शहर आणि जिल्ह्यात चंदगड, आजरा, गडहिंग्लज, मिरज, सांगली आदी भागांतील नागरिकांची रोज ये-जा असते. हेल्मेटसक्‍ती आदेशामुळे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील दुचाकी चालकांना हेल्मेट घालूनच बेळगाव जिल्ह्यात यावे लागणार आहे. उत्तर कर्नाटकातील 7 जिल्ह्यांत 27 जानेवारीपासून हेल्मेटसक्‍तीची अंमलबजावणी होणार आहे.पोलिस प्रशासनाच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी हेल्मेटसक्‍ती जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.