Mon, Aug 19, 2019 00:58होमपेज › Belgaon › कल भी तो सुरज निकलेगा दोस्तों!

कल भी तो सुरज निकलेगा दोस्तों!

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 31 2017 12:31AM

बुकमार्क करा
बेळगाव ः सतीश जाधव

नववर्षाच्या नव्या शुभदिनी आनंदाने गाऊ गाणी करू संकल्प विधायकतेचा एकत्वाचा...बांधव्याचा!

पाश्‍चात्त्यांच्या संस्कृतीनुसार का होईना नववर्षारंभाचा पहिला दिवस 24 तासांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे थर्टी फर्स्टची धामधूम दरवर्षीची असली तरी ती साजरी करताना उत्साहाने-उमेदीने करा, ल्लडबाजीने नको. जल्लोष असावा पण तो जीवावर बेतणारा नसावा, ही काळजीही तरुणाईने घेण्याची गरज आहे.  नववर्षाची पूर्वसंध्या रविवारची असल्याने वर्षअखेर साजरी करण्यासाठी पार्ट्यांचे बेत आखले गेले आहेत, पिकनिक स्पॉट निवडले गेले आहेत, मद्य व खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे, पण हे करताना अतिरेक होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे.

कारण नववर्षाची पहाट सर्वांसाठी आनंददायी ठरली पाहिजे, स्वतःच्या कुटुंबासाठी तर ती जास्त आनंददायी हवी. किमान दुःखदायक तरी नको. ‘कल भी तो सुरज निकलेगा दोस्तों..’ हे लक्षात घेऊनच वर्षअखेर एन्जॉय करायला हवी.