Sun, May 26, 2019 17:06होमपेज › Belgaon › हमसफर का मीठा स्वागत

हमसफर का मीठा स्वागत

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 8:55PMबेळगाव  प्रतिनिधी

येथील सिटीझन कौन्सिलतर्फे हमसफर एक्स्प्रेसचे मंगळवारी सकाळी बेळगाव रेल्वेस्थानकावर स्वागत करण्यात आले. रेल्वे चालक ए. आर. बगडे यांना मिठाई भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हैसूरमध्ये या एक्स्प्रेसचे उद्घाटन केले होते. पाच राज्यांना जोडणारी ही रेल्वे म्हैसूर ते उदयपूर मार्गावर धावणार आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश गुजरात, राज्यस्थान या राज्यांना जोडणारी ही पहिलीच हमसफर एक्स्प्रेस आहे. 

1 मार्चपासून आठवड्यातून एकदा ही रेल्वे धावणार आहे. 18 डब्यांची पूर्ण वातानुकूलित रेल्वे असणार आहे. बेळगावहून गुजरातला जाणार्‍या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची ठरणार आहे. 1 मार्चपासून दर गुरुवारी म्हैसूरहून सकाळी 10 वाजता निघणार असून रात्री 11.15 वाजता बेळगावला पोहोचेल. तर शनिवारी पहाटे उदयपूरला पोहोचेल. सोमवारी (दि.19) उद्घाटन झालेल्या हमसफर एक्स्प्रेसची ही उद्घाटन फेरी असणार आहे.

1 मार्चपासून पूर्णवेळ रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. हमसफर एक्स्प्रेसचा वेग ताशी 52 कि.मी आहे. तो 55 कि. मी पर्यंत होऊ शकतो. सध्या आठवड्यातून एकदा एक्स्प्रेस धावणार आहे. मात्र, आठवड्यातून दोनदा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सिटीझन कौन्सिलतर्फे सांगण्यात आले. यावेळी यावेळी सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, स्टेशन मास्टर एस. सुरेश, सेवंतीलाल शहा, विकास कलघटगी, अरुण कुलकर्णी, बसवराज जवळी, विक्रम पुरोहित, विजय भद्र, चंदन पुरोहित, संतोष शर्मा आदी उपस्थित होते.