Sun, May 26, 2019 08:45होमपेज › Belgaon › बेळगावच्या वृध्द दाम्पत्याची गोकाक धबधब्यात आत्महत्या

बेळगावच्या वृध्द दाम्पत्याची गोकाक धबधब्यात आत्महत्या

Published On: Feb 05 2018 1:59AM | Last Updated: Feb 04 2018 11:58PMबेळगाव  : प्रतिनिधी

काकतीवेस येथील वृध्द दाम्पत्याने गोकाक धबधब्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. सुरेश सहदेव औंधकर (66), पत्नी सुमित्रा (60) अशी त्यांची नावे आहेत. आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झालेे नाही. सुरेश व सुमित्रा काकतीवेस येथील एका घरात भाडोत्री राहत होते. सुरेश बॉम्बे बाजारमध्ये व्यवस्थापक होते. नामदेव देवकी समाज संस्थेमध्ये संचालक म्हणूनही  कार्यरत होते. हे दाम्पत्य मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी येथील होते. 

अनेक वर्षापासून येथे काम करत होते . शनिवारी सायंकाळपासून ते गायब होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुली आहेत. आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली. सुमित्रा यांचा मृतदेह सापडला असून सुरेश यांचा मृतदेह शोधमोहीम उशिरा पर्यंत सुरू होती.