Sun, Oct 20, 2019 11:22होमपेज › Belgaon › आठवडाभरात चार महिलांचा मृत्यू 

आठवडाभरात चार महिलांचा मृत्यू 

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 9:16PM
बेळगाव : प्रतिनिधी 

शहरामध्ये गेल्या आठ दिवसात वेगवेगळ्या कारणातून चार महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  नैराश्याने, चारित्र्याच्या संशयाने, मानसिक त्रास ही यामगील कारणे आहेत. गेल्या रविवारी मूळच्या कित्तूरच्या सध्या टिळकवाडी येथे भाडोत्री राहणार्‍या कविता प्रकाश चल्‍लूर (32) हिने राहत्या घरातच आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. 2 रोजी घडली. एका नामवंत विमा कंपनीमध्ये कामाला असणार्‍या महिलेने पतीकडून सोडचिठ्ठी घेतल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केली आहे. घटनेची नोंद टिळकवाडी पोलिस स्थानकात झाली आहे. 

मजगाव येथील विवाहितेला एकाकडून वारंवार फोनवर मेसेज पाठवून मानसिक त्रास देण्यात येत होता. या तणावाखाली येऊन विवाहिता रेखा संतोष सातगौडा (25) हिने घरी आत्महत्या केली. या प्रकरणी अनगोळ येथील पंकज बुद्धन्नावर या युवकाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिसर्‍या घटनेमध्ये भारतनगर पहिला क्रॉस येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवार 5 रोजी घडली. नयना शटवे (20) असे तिचे नाव आहे. वर्षभरापूर्वीच घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केलेल्या या दांपत्यामध्ये निर्माण झालेल्या संशयाने विवाहितेचा बळी गेला आहे. या प्रकरणी या प्रकरणी पती अमित शटवे याच्यावर तक्रार दाखल करण्यात आला होता. अमितला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

चौथ्या घटनेमध्ये नेहरूनगर येथील जीमच्या संचालिकेने निराशेतून गुरुवार 5 रोजी आत्महत्या केली. अर्चना यशवंत शिंदे (48) रा. असे तिचे नाव आहे. पाच वषार्ंपूर्वी नवर्‍याशी घेतलेली फारकत व जीमचा व्यवसाय चालत नसल्याच्या मानसिक त्रासातून तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेची नोंद एपीएमसी पोलिस स्थानकात झाली आहे. या सर्व आत्महत्यांमागे समस्येला सामोरे जाण्याची हिंमत या महिलांमध्ये नव्हती. पतीच्या जाचाला समर्थपणे तोंड देऊन प्रसंगी पोलिसांची मदत घेऊन तिला आपला जीव वाचवता आला असता शिवाय संबंधिताना जेरबंद करता आले असते. निराश न होता जीवन जगण्यासाठी संघर्ष करायला हवा. महिला या सबला आहेत, याची जाणीव त्यांनी ठेवली असती तर उपरोक्‍त घटना कदाचित घडल्या नसत्या.

 

 

tags ; Belgaum,news,four,women,died,city,in,last,eight,days,