Sat, Apr 20, 2019 08:39होमपेज › Belgaon › 9.58 लाख रेशनधारकांना ‘अन्‍नभाग्य’चा लाभ

9.58 लाख रेशनधारकांना ‘अन्‍नभाग्य’चा लाभ

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 28 2018 11:12PMबेळगाव : प्रतिनिधी

सिध्दरामय्या सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या साडेचार वर्षात राज्यातील कोट्यवधी रेशनकार्ड धारकानां अन्नभाग्य योजनेद्वारे आहार पुरवठा करत आहेत. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील 9 लाख 58 हजार 317 कुटुंबांना अन्नभाग्य योजनेचा लाभ देण्यात येतो, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने  पत्रकानुसार दिली आहे.  अनिलभाग्य योजनेखाली पहिल्या टप्प्यात 1 लाख 18000 कुटुंबांना गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले आहे. त्याशिवाय सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी व हजेरी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार, मसाला दूध व सायकली देण्यात आल्या आहेत.

याशिवाय गणवेश, बूट व सॉक्स, पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली आहेत.  सरकारी व अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील 19 हजार 245 विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले आहे. त्याशिवाय दोन लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले आहे.  1329 पाणी योजना पूर्ण 
बेळगाव जिल्ह्यामध्ये 2017-18 मध्ये एकूण 1989 पाणी योजना हाती घेण्यात आल्या असून त्यापैकी 1329 योजना पूर्ण केल्या आहेत. 468 योजना प्रगतीपथावर आहेत. यासाठी 88 कोटी 20 लाख 3000 रू.खर्च करण्यात आले आहेत. 

दुष्काळ निवारण योजनेखाली 409 पाणी योजना हाती घेऊन त्या पूर्ण केल्या आहेत. त्यासाठी 5 कोटी 99 लाख 56000 रू. निधी खर्च केला आहे. बहुग्राम पाणी योजनेखाली जिल्ह्यात 30 कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी 17 योजना पूर्ण करून त्यासाठी 32 कोटी 6 लाख 70,000 रू. खर्च केला आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये 1360 पाणी शुध्दीकरण घटक मंजूर करून त्यापैकी 1,264 केंद्राचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी 77 कोटी 38 लाख 32000 रू. निधी खर्च केला आहे. 

ग्रामविकास योजनेसाठी  76 गावांची निवड 

ग्रामविकास योजनेखाली 76 गावांची निवड करून तेथे रस्ते, अंगणवाडी, इमारती, समुदायभवनाची निर्मिती करून त्यासाठी 23 कोटी 43 लाख 54000 रू. निधी खर्च केला आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये 2017-18 मध्ये स्वच्छ भारत योजनेखाली हागणदारीमुक्‍त जिल्हा बनविण्यासाठी अंतिम टप्प्यात काम असून 83 हजार 570 शौचालये बांधण्यात आली आहेत. समाजकल्याण खात्याच्या वतीने 2017-18 मध्ये एकूण 23 कोटी रू. खर्च करण्यात आला आहे. तर तालुका पंचायतीच्यावतीने 21 कोटी 83 लाख रू. खर्च करण्यात आला आहे. 4 लाख 46000 मुलांना आठवड्यातील पाच दिवस दूध देण्यात येते, अशी माहितीही प्रशासनाने दिली आहे.