Tue, Mar 26, 2019 11:43होमपेज › Belgaon › धावत्या वाहनाला आग; खबरदारी गरजेची

धावत्या वाहनाला आग; खबरदारी गरजेची

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 29 2017 10:01PM

बुकमार्क करा
बेळगाव ः सतीश जाधव 

शहर परिसरात धावत्या वाहनाला  आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याला चालकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. कमी दर्जाचे व जादाचे वायरिंग,  इंधन गळती, स्पार्कमुळे शॉटसर्किटचा धोका वाढतो व वाहन अचानक पेट घेते. यासाठी वाहन मालकाने योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. ग्लोब चित्रपटगृहाजवळ अचानक  कारने पेट घेतला. कारचे नुकसान झाले असून समोरचा खाक झाला. बुधवारी रात्री 8.30 च्या दरम्यान घटना घडली. वाहतूक पोलिस व नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे धावत्या वाहनाला आग लागण्याचा मुद्दा ऐरणीवरआला आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. बंगळूर-पुणे मार्गावर  आराम बसला लाग लागून अनेकांना जीव गमावावा लागला आहे. वाहन मालकाच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना होतात. 

एसपीएम रोडवर मंगळवारी (दि.26) सकाळी चालत्या रिक्षातून अचनाक धूर येण्यास सुरुवात झाली. चालकासह प्रवाशांची तारांबळ उडाली. इतर रिक्षाचालकांनी रिक्षा बाजूला केली. या प्रकाराने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक काही काळ ठप्प होती. घटना शॉर्टसर्कीटमुळे झाल्याचे निदर्शनास आलेे. नंतर लगेच बुधवारी झालेल्या घटनेनंतर चालकांच्या सुरक्षाचा मुद्दा  उपस्थित झाला आहे. 
नवीन किंवा जुने वाहन खरेदी केल्यानंतर मालकांकडून वाहनात अंतर्गत जादा वायरिंग केले जाते. त्यात वापरण्यात येणारी वायर निकृष्ट नसते. वायरिंग चांगल्या प्रकारचे नसते. अशा वेळी वाहनासमोर असलेल्या फॅनमध्ये वायर अडकते व स्पार्क होण्याच्या घटना घडतात. जुन्या वाहनांचे वायरिंग करताना अनेक मेकॅनिक फ्यूज बसवत नाहीत. फ्यूज बसविली नाही तर आग लगेच लागू शकते. शॉट्रसर्कीटने आग लागल्यानंतर पेट्रोलचे वाहन असेल तर ते लवकर पेट घेते. यासाठी वेळेवर सर्व्हिसिंग व योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.