Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Belgaon › दाव्याच्या बळकटीसाठी तरुणांनी लढावे

दाव्याच्या बळकटीसाठी तरुणांनी लढावे

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 28 2018 11:30PMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाप्रश्‍न न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या लढाईबरोबर रस्त्यावरची लढाईही लढली पाहिजे. न्यायालयात कर्नाटक सरकार नेहमी पळवाट शोधते. खेडे हे घटक, भौगोलिक सलगता आणि लोकेच्छा यावर हा लढा लढत आहोत. येत्या काळात सीमाप्रश्‍नी तरुणांची मोठी भूमिका असेल. दाव्याच्या बळकटीसाठी तरुणांनी लढावे, असे आवाहन माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर यांनी केले. येळ्ळूर विभाग म. ए. समितीतर्फे येळ्ळूरच्या सैनिक भवनात साराबंदी व सीमालढ्यातील सत्याग्रहींचा सत्कार समारंभ रविवारी झाला. त्यावेळी प्रमुख वक्‍ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ता. पं. सदस्य रावजी पाटील होते. 

तर दाव्याला बळकटी : ओऊळकर

भाषा आणि संस्कृतीवर चाललेला हा प्रदीर्घ लढा आहे. फाजल अली कमिशन व महाजन अहवालाने मराठी बहुभाषिकांचेे पंख कापले आहेत. ही राजकीय पुंडशाही आहे. कर्नाटक सरकार सीमाभागावर नेहमीच अन्याय करत आहे. आमच्या दाव्याला बळकटी येण्यासाठी लोकेच्छा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तरुणांना एकत्र आणून लढले पाहिजे. यामुळे आपल्या दाव्याला बळकटी येईल असे दिनेश ओऊळकर म्हणाले. व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी आ. मनोहर किणेकर, कृष्णा मेणसे, अ‍ॅड. राम आपटे, माजी आ. परशुराम नंदिहळ्ळी, किसन येळ्ळूरकर, ग्रा.पं. अध्यक्षा अनसूया परीट उपस्थित होत्या.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.  शिवरायमूर्ती पूजन ओऊळकर यांनी केले. प्रास्ताविक एल. आय. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले. दुद्दाप्पा बागेवाडी यांनी आभार मानले.

62 सीमासत्याग्रहींचा सत्कार 

 यावेळी 62 सत्याग्रहींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये शांताबाई कुगजी, कृष्णा घाडी, यल्लाप्पा घाडी, वामण कुगजी, नारायण जाधव, बसवंत टक्केकर, केदारी गोरल, चांगाप्पा कणबरकर, इंदूबाई यळ्ळूरकर, पार्वती कदम, सुमन परिट, शांताराम मेलगे, वाय. बी. चौगुले, मल्लव्वा सांबरेकर, लक्ष्मण पाटील, परशराम मेणसे, मुकुंद खणगावकर, चांगाप्पा बेळगावकर, नारायण कुंडेकर आदी 62 जणांचा समावेश होता. हयात नसलेल्यांच्या वारसांचाही सत्कार करण्यात आला. 

भाषा आणि संस्कृतीवर चाललेला हा प्रदीर्घ लढा आहे. फाजल अली कमिशन व महाजन अहवालाने मराठी बहुभाषिकांचेे पंख कापले आहेत. ही राजकीय पुंडशाही आहे. कर्नाटक सरकार सीमाभागावर नेहमीच अन्याय करत आहे. आमच्या दाव्याला बळकटी येण्यासाठी लोकेच्छा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तरुणांना एकत्र आणून लढले पाहिजे. यामुळे आपल्या दाव्याला बळकटी येईल असे दिनेश ओऊळकर म्हणाले.

व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी आ. मनोहर किणेकर, कृष्णा मेणसे, अ‍ॅड. राम आपटे, माजी आ. परशुराम नंदिहळ्ळी, किसन येळ्ळूरकर, ग्रा.पं. अध्यक्षा अनसूया परीट उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.  शिवरायमूर्ती पूजन ओऊळकर यांनी केले. प्रास्ताविक एल. आय. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले. दुद्दाप्पा बागेवाडी यांनी आभार मानले.