Thu, Nov 15, 2018 09:29होमपेज › Belgaon › शेतकरी वार्‍यावर, कोबी रस्त्यावर

शेतकरी वार्‍यावर, कोबी रस्त्यावर

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 8:40PMबेळगाव  : प्रतिनिधी

बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव घटल्याने शेतकर्‍यांना याचा मोठा फटक बसत आहे. उत्पादन खर्च ही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतीपिकांना हमीभाव देण्यात यावा,  अशी मागणी करत शेतकरी संघटनानी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज कोबी, वाटाणा टाकून दिला.  शेतकर्‍यांकडून पिकविलेल्या भाजीपाल्यालाची कवडीमोल दराने खरेदी केली जात आहे. तालुक्यातील कडोली, देवगिरी, काकती, होनगा, आदी गावांमध्ये भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्या या भागात कोबी, फ्लावर, टोमॅटो ही पिके घेण्यात आली आहेत.

मात्र बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकर्‍यांना सदर पीक शेतामध्येच कुजवावे लागत आहेत. पीक बाजारात नेल्यास त्याचा वाहतूक खर्चही मिळेनासा झाल्यामुळे शेतकरी संतप्त आहेत.  एक एकरी कोबी पिकवण्यासाठी 45 ते 50 हजार खर्च येतो. सध्या एक क्‍विंटलला 100 रु भाव मिळत आहे. त्यानुसार एकरला 200 ते 250 क्‍विंटल उत्पादन निघाल्यास 20 ते 25 हजार हतामध्ये येतोत. त्यामुळे शेतकर्‍याला हा भाव न परवडणारा आहे. यासह कामगार खर्च, वाहतूक खर्च शेतकर्‍यांना न परवडणारा असल्यामुळे या पिकांनाही हमीभावाची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

या बरोबरच रोजगार हमी योजनेचा विस्तार करण्यात यावा, जेणेकरुन शेतकर्‍यांना ही यामधुन रोजगार मिळेल अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी रयत संघटनेचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब देसाई, सुभाष धायगोंडे, रामनगौडा पाटील, नामदेव धुडूम, बाळू मायण्णा, गजू राजाई, राजु कागणीकर आदी शेतकरी उपस्थित होत.