Sat, Aug 17, 2019 16:11होमपेज › Belgaon › शेतकर्‍यांनो, राज्यकर्त्यांवर आसूड उगारा : रघुनाथ पाटील

शेतकर्‍यांनो, राज्यकर्त्यांवर आसूड उगारा : रघुनाथ पाटील

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव  : प्रतिनिधी

देशातील राज्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना देशोधडीला लावले. प्रत्येक राज्यात भूसंपादनाचे घाट घातले जात आहेत. शेतकरीविरोधी राजकर्त्यांच्या धोरणामुळे 1996 पासून देशात आजपर्यंत 75 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या.  सरकारवर आसूड उगारा, असे आवाहन  महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी  केले.  त्यांच्या शेतकरी संघटनेतर्फे शेतकरी जागर यात्रा सुरू आहे. शनिवार 24 रोजी यात्रा येथे आल्यानंतर मराठा मंदिरात झालेल्या सभेत ते बोलत होते. शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कलिदास अप्पय, प्रा. सुशीला घोडदाळे, किशोर धमाले, शिवाजी नांदकिले, शंकर गायकवाड, जयश्री गुरुण्णावर, शेती बचाव समितीचे अध्यक्ष बाळाराम पोटे, बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत व्यासपीठावर होते.

शहीद व हुतात्मा शेतकर्‍यांना अभिवादन करण्यात आले. रघुनाथ पाटील म्हणाले,  देशात हमीभाव मिळायची खात्री नाही. शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकर्‍यांना स्वत:ची जमीन विकावी लागत आहे. सरकारच्या धोरणाविरोधात देशातील सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहेे. आम्ही सुरू केलेल्या यात्रेची सांगता 27 एप्रिलला पुण्यात फुलेवाडा येथे होणार आहे.  नारायण सावंत म्हणाले, देशाची सत्ता शेतकर्‍यांच्या हातात आल्याशिवाय बळीराजाची प्रगती होणार नाही. प्रा. सुशीला घोडदाळे म्हणाल्या, कोणत्याही पक्षाचे सरकार असो  त्यांच्याकडून शेतकर्‍यांना दडपशाहीची भाषा वापरली जात आहेे. किशोर धमाले यांनीही मार्गदर्शन केले. 

सभेत बाळाराम पोटे यांनी मच्छे-हलगा बायपासबाबत माहिती दिली. या कामाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही केंद्रीय मंत्री या कामाचे कसे काय उदघाटन करतात, असा सवाल करून केंद्र सरकारच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला.
 


  •