Mon, Apr 22, 2019 16:33होमपेज › Belgaon › जळीतग्रस्त कुटुंबाला भरपाई देऊ

जळीतग्रस्त कुटुंबाला भरपाई देऊ

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 10:35PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी       

के. के. कोप्प येथील सोमेश्‍वरनगरातील जळीतग्रस्त संतोष गुडमकेरी यांच्या निवासस्थानी जाऊन  आ. संजय पाटील यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. संतोष यांच्या घराला आग लागून सोने, रोकड, दुचाकी, लाकडी सामान भस्मसात झाले.

आ. पाटील यांनी ग्रामस्थांशी चर्चा करताना गुडमकेरी यांना सरकारकडून भरपाई मिळवून देऊ, असे आश्‍वासन  दिले. ता. पं. सदस्य कल्लप्पा संपगांवी, सदेप्पा संबरगी, लक्ष्मण तळवार, संजू वाघ, सोमाजी बसण्णावर, शेखरगौडा पाटील, यलशेट्टी गाणगी, रायप्पा नंदी, सिध्दप्पा नेरलगी, प्रकाश करेण्णवर,  संजू करेण्णवर, नारायण संबरगी, रायप्पा  करेण्णवर उपस्थित  होते.