Thu, Jun 27, 2019 02:17होमपेज › Belgaon › नाट्य महोत्सवास शानदार प्रारंभ

नाट्य महोत्सवास शानदार प्रारंभ

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 10:40PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेतर्फे आयोजित चार दिवशीय नाट्य महोत्सवास मंगळवारी शानदार प्रारंभ झाला. सावगाव रोडवरील अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेच्या सभागृहात आयोजित या नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ रंगकर्मी स्वा. सै. विठ्ठल याळगी व उद्योजक संजीव देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ डॉ. नितिन खोत यांनी संकलन केलेल्या ‘वेणूग्राम ते स्मार्टसिटी’ हा ‘लाईट अँड साऊंड’ या कार्यक्रमातून सुमारे एक हजार वर्षापूवीचा बेळगाव शहराचा इतिहास दाखविण्यात आला.

यामध्ये स्वातंत्रपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळाचा इंत्यंभूत आणि ओवघता मागोवा घेण्यात आला. यामध्ये जैन कालखंड, बहाणमी कालखंड, भूईकोट किल्ला, ब्रिटीश साम्राज्य, मराठा साम्राज्य, सौंदत्ती डोंगराचा इतिहास अशा घटनांना उजाळा देण्यात आला. उत्कृष्ट नेपथ्य आणि प्रकाश योजनेमुळे लाईट अँड स्मार्टसिटी या कार्यक्रमातून बेळगावचा समग्र आाणि ज्वलंत इतिहासाचे दर्शन घडविण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उद्योजक अजित लोकूर, सुनील नाईक, अशोक याळगी, दत्तात्तय शिंदे, वेंकटेश शिंदे,  अध्यक्षा वीणा लोकूर, नीता कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रारंभी नीता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर विणा लोकूर यांच्या हस्ते पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीतर्फे दत्तात्रय शिंदे यांनी डॉ. नितिन खोत यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या चार दिवशी नाट्य महोत्सवात बुधवार दि. 27 रोजी कोल्हापूरच्या एमव्ही थिएटर्सतर्फे ‘हॅम्लेट’ हे दोन अंकी नाटक, दि. 28 रोजी गायन समाज देवल क्लब कोल्हापूरतर्फे दोन अंकी ‘दर्द ए डिस्को’, दि.29 रोजी  अ. भा. मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेतर्फे ‘एक शुन्य सीमारेषा’ हे दोन अंकी नाटक सादर करण्यात येणार आहे. सदर नाटकाना दररोज सायंकाळी 6.30 वाजता सुरुवात होणार आहे.