Mon, May 20, 2019 18:25होमपेज › Belgaon › बेळगावच्या डॉक्टरांचाही आयोगाला विरोध 

बेळगावच्या डॉक्टरांचाही आयोगाला विरोध 

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 12:50AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

नीती आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने भारतीय वैद्यकीय परिषद रद्द करून त्याजागी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने कडाडून विरोध केला असून त्याच्या निषेधार्थ मंगळवारी खासही दवाखान्यातील बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवून डॉक्टरांनी निषेध नोंदविला. 

इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव शाखेच्या आदेशानुसार बेळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये आपल्या दवाखान्यातील बाह्य रुग्ण सेवा बंद ठेवून सकाळी 6 वा. पासून ते सायं. 6 वा. पर्यंत बंद पाळला. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. 

आयएमएचा हा लाक्षणिक संप असल्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली नसल्याचे आयएमएचेम म्हणणे आहे. तरीही मंगळवारी जिल्हा इस्पितळामध्ये बाह्य रुग्णांची गर्दी झाली होती. डॉक्टरांनी आज जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. 

आयएमएचा तीव्र विरोध 

बेळगाव : प्रतिनिधी केंद्राने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या धोरणानुसार वैद्यकीय महाविद्यालयांना 60 टक्के प्रवेश जागा देण्यात येणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाला पाच वर्षानंतर परवानगी घेतली तरी चालते अशी आयोगामध्ये तरतूद करण्याचा विचार केंद्राचा आहे. त्यामुळे वैद्यकीय  महाविद्यालये काढण्यास जे नियम आहेत ते नियम पायदळी तुडविले जाणार आहेत. भारतीय वैद्यकीय परिषदेच्या नियमातील त्रुटी दूर कराव्यात परंतु सदर संस्थाच रद्द करून वैद्यकीय क्षेत्र मोकाट सोडण्यास आयएमएचा तीव्र विरोध आहे. 

आयुर्वेदीक व होमिओपॅथिक डॉक्टरर्सना तीन महिन्याचा कोर्स करायला लावून अ‍ॅलोपॅथिक औषधांचा वापर करण्यास मुभा देणे हे चुकीचे असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे, असे डॉ. सूचित्रा लाटकर यांनी सांंगितले.

आयएमएने भारतीय वैद्यकीय आयोगाला कडाडून विरोध केल्यामुळे केंद्र सरकारने आयएमएने सूचित केलेल्या सूचनांचा गांधीर्याने विचार करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. राजेश लाटकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना आयएमएचे पदाधिकारी व सभासद डॉक्टर्स उपस्थित होते.