Wed, Jul 24, 2019 12:25होमपेज › Belgaon › फिल्मीस्टाईल कारवाई नको, ठोस कृती हवी

फिल्मीस्टाईल कारवाई नको, ठोस कृती हवी

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 10:43PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

चित्रपटांमध्ये प्रत्येकवेळी एखादी घटना घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी येत असतात, असे चित्रण नेहमीच पाहावयास मिळते. असाच प्रकार सध्या बेळगावातही पाहायला मिळतो. आजवर अनेकवेळा शहरात जातीय दंगली घडल्या असतानाही समाजकंटकांच्या कारवायांंना आळा घालण्याचे काम बेळगाव पोलिसांकडून झालेले नाही. जातीय तणावानंतर फिल्मी स्टाईलने येणारे पोलिस निष्पापांना लक्ष्य बनवतात. त्यामुळे पोलिसांनी कामकाजात नव्या पद्धतीचा अवलंब करावा, अशा प्रतिक्रिया तणावग्रस्त भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. 

रविवारी रात्री शहापूर आणि कसाई गल्ली परिसरात जातीय तणाव निर्माण झाला. समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीने शहराची शांतता भंग झाली. याप्रकरणी पोलिसांनी 27 जणांंना अटक केली आहे. अटकेत असलेल्या संशयित आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. जातीय दंगलीत अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक ठरला आहे. तणावग्रस्त भागातील नागरिक वारंवारच्या दहशतीच्या वातावरणाला कंटाळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांशी संवाद साधला असता प्रत्येकाने सामाजिक शांततेवर भर दिला. त्याचबरोबर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.