Wed, May 22, 2019 21:07होमपेज › Belgaon ›

दरडोई उत्पन्नात बेळगाव विभाग तिसर्‍या स्थानी

दरडोई उत्पन्नात बेळगाव विभाग तिसर्‍या स्थानी

Published On: Apr 05 2018 2:13AM | Last Updated: Apr 05 2018 12:38AMबेळगाव : तिनिधी

दरडोई उत्पन्नात बेळगाव विभाग राज्यात तिसर्‍यास्थानी आहे. अपेक्षेप्रमाणे राजधानी तसेच माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र असलेले बंगळूर शहर  विभाग पहिल्या स्थानी आहे. पर्यटनात आघाडीवर असलेला म्हैसूर विभाग दुसर्‍या स्थानी आहे. यानंतर बेळगाव व शेवटच्या स्थानी गुलबर्गा विभाग आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची शेती किंवा अन्य उत्पादन क्षमता भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळी आहे. गुलबर्गा शेती उत्पादनात मागे आहे. बांधकाम कामगारांच्या हाताला काम मिळत नसल्याने ते पोटापाण्यासाठी स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे महसुलात गुलबर्गा जिल्हा पिछाडीवर असल्याचे दिसून येते.डॉ. डी. एम. नंजुडप्पा अहवालानुसार प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी दहाउपक्रम हाती घेण्यात आले असल्याचे सरकार नेहमी सांगत आले आहे. हैदराबाद?कर्नाटकासाठी घटनेचे कलम 371 जे अंतर्गत विशेष दर्जा देऊन प्रतिवर्षी हजारो कोटींचे अनुदान तसेच नेमणुका, शिक्षणात आरक्षण दिले असले तरी या भागातील जनतेच्या जीवनमानात सुधारणा झालेली नाही. 

बेळगावला विशेष दर्जाही नाही. शिवाय सीमावर्ती भाग असल्यामुळे बेळगावकडे कर्नाटकने नेहमीच सावत्रपणे पाहिले आहे. यामुळेच कुशल मनुष्यबळ, उद्योगांसाठी पोषक वातावरण आणि शिक्षण क्षेत्रातील अव्वल संस्था बेळगावात असूनही दरडोई उत्पन्नात बेळगाव विभाग राज्यात तिसर्‍या स्थानी आहे. बेळगाव विभागाचे दरडोई उत्पन्न 91 हजार 942 रुपये आहे. बंगळूर शहराचे दरडोई उत्पन्न 2 लाख 40 हजार 448 रुपये आहे. राज्याची राजधानी, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे दक्षिण भारतातील दुसरे महत्त्वाचे केंद्र या वैशिष्ट्यांमुळे ते अपेक्षितही आहे.

मागास जिल्हे म्हणून ओळखले जाणारे कोप्पळ? 74,134 रु., बिदर? 73,892 रु.,यादगिरी? 68,928 रु. तर गुलबर्गा? 65, 493 रु. असे उत्पन्न आहे. गुलबर्गा विभागात गुलबर्गासह बिदर, यादगिरी, रायचूर, बळ्ळारी व कोप्पळ या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रादेशिक असमतोल अर्थतज्ज्ञ डॉ. नंजुडप्पा अध्यक्षतेखाली प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या  अहवालात राज्यातील 39 अत्यंत मागास तालुक्यांपैकी 26 तालुके उत्तर कर्नाटकात असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मागास तालुक्यांच्या विकासासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याबरोबरच  विशेष कार्यक्रम हाती घेण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार उपक्रम हाती घेण्यात आले तरी मागास तालुक्यांच्या सुधारणेत काहीच फरक पडला नाही, ती मागासच राहिली आहेत.

Tags : Belgaon, Belgaum, division, third,  per, capita, income