Sun, Jul 21, 2019 10:38होमपेज › Belgaon › तुटपुंज्या निधीत कामे करायची कशी 

तुटपुंज्या निधीत कामे करायची कशी 

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 28 2018 9:00PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये बेळगाव जिल्हा विस्ताराने व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. यास्तव जि.पं.ला जास्त अनुदान मंजूर करावे, अशी मागणी सभासदांनी सरकारकडे केली आहे. या विषयावर बेळगाव सुवर्णसौधमध्ये झालेल्या चर्चेतही वाढीव अनुदान येण्याबद्दल चर्चा झाली आहे. या विषयावर ठराव मंजूर करून सरकारला पाठविण्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांनी दिली.

प्रत्येक जिल्ह्याला ‘लिंक डॉक्युमेंट’खाली लोकसंख्येच्या आधारावर सरकार अनुदान मंजूर करून वितरित करते. जि. पं. योजना विभागाने तयार केलेल्या आराखड्याला जि. पं. सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर तो सरकारला पाठवण्यात येतो. त्याशिवाय जि. पं. अध्यक्षांना विकास निधी म्हणून मागील वर्षापासून 4 कोटीचा निधी देण्यास प्रारंभ केला आहे.
लिंक डॉक्युमेंंटनुसार बेळगाव जि. पं. ला 636 कोटी, 10 ता. पं. ना एकूण 1226 कोटी रु. व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 56 कोटी याप्रकारे 1918 कोटी  रु. चा निधी दिला जातो, अशी माहिती मुख्य लेखापाल अधिकारी शंकरानंद संबरगी यांनी दिली. 

बेळगाव जि. पं. मध्ये 90 सभासद आहेत. त्या सर्वांच्या मतदारसंघातील समस्या दूर करण्यासाठी भरीव निधीची  गरज आहे. यासाठी सर्वच सभासदांनी राज्याचे ग्रामीण विकासमंत्री एच. के. पाटील यांना समस्या  सांगण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.  ग्रामपंचायत सदस्य हे जि.पं. सभासदापेक्षा वर्षाला जास्त निधी मंजूर करून घेऊन विकासकामे करतात. जि. पं. सभासदांना दरवर्षी प्रत्येकी 7 लाखाचा निधी दिला तर यामधून कोणती कामे करायची, असा सवालही सभासदांनी जि. पं. अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना केला आहे.