Tue, May 21, 2019 22:39होमपेज › Belgaon › बेळगाव हे सुसंस्कृत शहर 

बेळगाव हे सुसंस्कृत शहर 

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:52PMबेळगाव : प्रतिनिधी

आपल्या तीन वर्षे चार महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात जिल्ह्यातील नागरिकांचेे सहकार्य मिळाले. बेळगाव हे सुसंस्कृत आणि सुंदर शहर आहे. या ठिकाणी पुन्हा सेवा करण्याची संधी मिळाल्यास निश्‍चित आवडेल असे मंगळूरला बदली झालेले जिल्हापोलिस प्रमुख रविकांतेगौडा यानी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, आपल्या कारकिर्दीत कायदा, सुव्यवस्था राखण्याबरोबरच खून, दरोडे, चोरीचे प्रमाण कमी झाले. चेनस्नॅचिंग मध्येही  घट झाली.

जातीय दंगलीबाबत लहानसहान घटना वगळता मोठ्या घटना घडल्या नाही. त्यामुळे आपल्या तीन वर्षाच्या कालावधीत कायदा सुव्यवस्था राखण्यात यश मिळाले.  बीट व्यवस्था,पोलिस कवायतमध्ये कानडी भाषेचा वापर या योजनांची दखल सरकारने घेतली. पोलिस स्थानकात येणार्‍या व्यक्तीला वृत्तपत्र, पाणी व सहकार्य दिले.  त्यामुळे पोलिसांबाबत आदर निर्माण झाला . मागील दोन वर्षात सौंदत्ती, रामदुर्ग व खानापूर तालुक्यात  25 हून अधिक बालविवाह रोखण्याबरोबरच शाळांमध्ये पोलिसांमार्फत मार्गदर्शन केले. यामुळे मी समाधानी आहे. असे रविकांतेगौडा म्हणाले. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख रविंद्र गडादी उपस्थित होते.