Mon, Apr 22, 2019 23:59होमपेज › Belgaon › आ. जारकीहोळींमुळे यमकनमर्डीचा विकास : सिध्दरामय्या

आ. जारकीहोळींमुळे यमकनमर्डीचा विकास : सिध्दरामय्या

Published On: Dec 25 2017 1:21AM | Last Updated: Dec 24 2017 8:24PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

राज्य सरकारने पाणीपुरवठा योजनांसाठी 50 हजार कोटीपेक्षा अधिक निधी खर्च केला. यमकनमर्डी मतदारसंघातील विकासकामांसाठी आ. सतीश जारकीहोळी यांनी योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नातून अनेक विकासाभिमुख कामे राबविण्यात आली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केले. यमकनमर्डी येथे सीईएस हायस्कूलच्या मैदानावर राज्य सरकारचा साधना मेळावा झाला. यमकनमर्डी मतदारसंघातील 7403.63 लाख खर्चाच्या कामांची कोनशिला व उद्घाटन करून मुख्यमंत्री बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पाटबंधारेमंत्री एम. बी. पाटील उपस्थित होते. उत्तर कर्नाटकाच्या विकासाला चालना दिली आहे. उत्तर कर्नाटकासाठी 30 हजार कोटींपेक्षा अधिक निधी खर्च केला आहे, असे ते म्हणाले. 

यमकनमर्डीच्या विकासासाठी आ. सतीश जारकीहोळी यांनी अधिक परिश्रम घेतले आहेत. पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून जवळपास 2 हजार एकर जमीन पाणलोट क्षेत्रात आणली आहे. जलसंपदा खात्याकडून  महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले, सरकारने पाणी पुरवठा योजनांवर भर देऊन राज्यातील दुष्काळी भागातील जनतेला दिलासा दिला आहे. नागरिकांनी सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या  सबल झाले पाहिजे. यासाठी सरकारच्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. यावेळी आ. फिरोज सेठ, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबले, जिल्हाधिकारी झियाउल्ला ए. उपस्थित होते.