Tue, Nov 20, 2018 03:22होमपेज › Belgaon › बाकनूर, बैलूरला हत्तीचा धुमाकूळ

बाकनूर, बैलूरला हत्तीचा धुमाकूळ

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 10:53PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

चार्‍याच्या शोधात असलेल्या हत्तीने लोकवस्तींकडे धाव घेतली आहे. हत्तीकडून शेतकर्‍यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. यामुळे नागरिकांत भीती व संताप आहे. बाकनूर व बैलूरला डोंगराळ भाग लागून असल्याने जंगली प्राण्याकडून पिकांचे सर्वात जास्त नुकसान केले जाते. वन विभागाने ठोस उपाययोजना आखल्या नसल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.  

मंगळवारी (दि.5) रात्री हत्तीने बाकनूर परिसरातील बुद्धाजी नागोजी सावंत याच्या ऊसपिकाचे नुकसान केले. 30 टन उसाचे नुकसान केल्याची माहिती मिळाली. बैलूर परिसरातही हत्तीकडून हैदोस चालूच असून पावणू हलगेकर यांच्या भाताच्या गंजीचे नुकसान केले. बाकनूरसह जंगल भागातील परिसरात जंगली प्राणी गावात येऊ नये म्हणून वन विभागाकडून काही वर्षापूर्वी चर खोदाई करण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणाहून ही चर बुजल्याने प्राणी पिकांचे नुकसान करत आहेत.