Thu, Jun 27, 2019 17:48होमपेज › Belgaon › कचरा हद्दपार, क्रिकेट मैदान तयार

कचरा हद्दपार, क्रिकेट मैदान तयार

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 29 2017 9:59PM

बुकमार्क करा
बेळगाव ः प्रतिनिधी

शहापूर विभागात क्रिकेट खेळण्यासाठी मैदान नसल्याने येथील कोरे गल्ली स्पोर्टस् क्लबच्या युवकांनी महात्मा फुले रोडवर अवघ्या दोन महिन्यात खासगी जागेत मैदान तयार केले. मागील दोन वर्षापासून मैदानाचे काम करण्यात येत असून दोन महिन्यापासून गती देण्यात आली आहे. शहापूर विभागातील युवकांना खेळण्यासाठी मैदान नसल्याने अडथळे येथे आहेत. यासाठी मनपाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

महिनाभरात या ठिकाणी स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. यासाठी मैदानाच्या कामाला गती देण्यात आली आहे. मैदान बनविण्यासाठी 10 टिप्पर म्हणजे 40 ट्रॅक्टर माती लागली. मैदानासाठी स्वखर्चातून 21 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. येथील खासगी जागेत मातीचे ढिगारे, कचरा टाकण्यात येत होते. यासाठी जेसीबी व टॅक्टरच्या सहाय्याने सर्व स्वच्छता करून युवकांनी हाफपिच क्रिेकेट खेळण्यासाठी मैदान बनविले आहे. मंडळातील सर्व सदस्य काम करून रात्री 2 तास व रविवारी दिवसभर मैदानाच्या कामासाठी देतात. शहापूर येथील खासगी जागेत मैदान बनिविले असून यासाठी जागा मालकांनी मदत केली असल्याची माहिती युवकांनी दिली. 

मैदान बनविण्यासाठी युवराज हावळाण्णाचे, अविनाश शिंदे, महेश हावळाण्णाचे, राहूल बाचीकर, शुभम केरवाडकर, सुजीत मजुकर, योगेश नेसरीकर, महेश कुंडेकर, ओमकार केरवाडकर आदींनी परिश्रम 
घेतले. शहापूर परिसरात क्रिकेट खेळण्यासाठी मैदान नाही. यासाठी खासगी जागा मालकांशी चर्चा करून मैदान बनविले. दोन वर्षापासून काम चालू होते. मात्र, 2 महिन्यापासून याला गती देण्यात आली आहे. 
    - शुभम केरवाडर

येथे टाकण्यात आलेला कचरा काढला. मैदानासाठी 10 टिप्पर माती लागली. कामाला जावून रात्री व रविवारी पुर्ण वेळ मैदानासाठी तरुणांनी दिला. महिनाभरात स्पर्धा भरविणार असून यानंतरही खेळण्यासाठी मैदानाचा फायदा होईल. 
    - योगेश नेसरीकर