Wed, Apr 24, 2019 00:23होमपेज › Belgaon › जिल्हाधिकार्‍यांचे कन्‍नडप्रेम झाले जागे

जिल्हाधिकार्‍यांचे कन्‍नडप्रेम झाले जागे

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 29 2018 11:03PMबेळगाव : प्रतिनिधी 

‘मला मराठी समजत नाही. त्यामुळे तुम्ही कन्‍नडमध्ये बोला, कन्‍नडमध्ये बोलला तरच तुम्ही बोललेली समस्या इतिवृत्तामध्ये नमूद होते,’ असे सांगत जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी आज कन्‍नडप्रेम दाखवले; पण आमदारांनीही त्यांना प्रत्युत्तर देत, ‘तुम्हाला मराठी कळत नसेल तर हिंदी तरी कळते ना,’ असा प्रतिप्रश्‍न करत हिंदीमध्ये  समस्या मांडली. त्यावरून आज जिल्हा पंचायतीच्या केडीपी बैठकीत गदारोळ माजला. खानापूरचे आमदार अरविंद पाटील यांनी तालुक्यातील पाणी समस्येकडे लक्ष  वेधताना नद्या, नाले खानापूर तालुक्यातून वाहत असल्या, तरी स्थानिक जनतेला पाणी नाही, कर्नाटक सरकारला हुबळी, धारवाड, गदगच्या पाणी समस्येची चिंता आहे, अशी टीका केली. 
 
वाद टाळण्यासाठीच : मोरे

अधिकारी आणि आमदारांमध्ये वाद टाळण्यासाठीच मी मराठी कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित केला. मी मराठी आहे आणि सीमा प्रश्‍न हा मराठी माणसांचा श्‍वास आहे. तो सुटावा हीच माझ्यासह सार्‍या मराठी माणसांची भावना आहे. याआधी मी स्वतः मराठीमध्ये समस्या मांडल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे मत मोहन मोरे यांनी ‘पुढारी’कडे व्यक्‍त केले.