Thu, Jun 27, 2019 11:40होमपेज › Belgaon › चिमुरडीवर अत्याचार

चिमुरडीवर अत्याचार

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 14 2017 12:11AM

बुकमार्क करा

 बेळगाव ः प्रतिनिधी

शहरातील गुन्हेगारीने नागरिकांना भयभीत केले आहे. दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींवर अनगोळ व वडगाव परिसरात लैंगिक अत्याचार केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामध्ये 70 वर्षीय वृद्ध नराधमाने दोन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

वडगाव नाझर कॅम्प येथे सुरेश नारायण कोपर्डे याने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित चिमुरडीच्या आई-वडिलांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरेशला अटक करून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

 दरम्यान, शिवशक्तीनगर अनगोळ येथे राहणार्‍या 17 वर्षीय तरुणाने अनगोळ परिसरातील एका 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या मुलाविरोधात पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती  पोलिसांनी दिली. या अत्याचाराच्या प्रकरणांमुळे बेळगावातील महिला आणि युवतींच्या सुरक्षतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.