Fri, Apr 26, 2019 09:25होमपेज › Belgaon › केंद्र सरकारचे धोरण शेतीच्या मुळावर

केंद्र सरकारचे धोरण शेतीच्या मुळावर

Published On: Jan 23 2018 1:17AM | Last Updated: Jan 22 2018 9:38PMबेळगाव : प्रतिनिधी  

देशातील शेतकर्‍यांना अद्याप ‘अच्छे दिना’ची प्रतीक्षाच आहे. केंद्र सरकारचे कृषी धोरण शेतीच्या मुळावर येणारे आहे. नवे सरकार जुन्या कायद्यावर झडप घालत आहे, असे विचार ज्येष्ठ कामगार नेते  डॉ. भालचंद्र कानगो यांनी मांडले.रंगमंदिरात सार्वजनिक वाचनालयतर्फे सुरू असलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत चौथे पुष्प कानगो यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष अनंत लाड होते. कार्यवाह अनंत जांगळे उपस्थित होते. 

भालचंद्र कानगो पुढे म्हणाले, 2013 ला भूसंपादन कायद्यात केंद्राने बदल केला. यात शेतकर्‍यांचे मरण आहे. यामुळे शेतकर्‍यांत अस्वस्थता आहे. सत्ता उद्योगपतीकडे झुकली जात असल्याने शेतकर्‍यांचे भवितव्य  अंध:कारमय बनत आहे.  लोकशाहीचे बलिदान  करून विकास करू पाहणारे शेतीचे भले कसे करणार हा प्रश्‍न आहे. शेतीपासून भारतीय तरुणाई दूर जात असल्याबाबत कानगो म्हणाले, भारतात दरदिवसा 2837 शेतकरी शेती सोडून दुसरा कामधंदा करत आहे. 1995 ते 2005 दरम्यान देशात 11 कोटी शेतकर्‍यांपैकी दीड कोटी शेतकर्‍यांची संख्या कमी झाली आहे. हे चित्र विदारक आहे. शेती बद्दल आकर्षणता वाढविण्याबाबत सरकार निद्रिस्त आहे. शेतीमध्ये नफ्याचा व्यवहार होण्यासाठी सरकारने अधिकाधिक गुंतवणूक करण्याची गरज आहे.