Sat, Jun 06, 2020 20:41होमपेज › Belgaon › आराम बस पलटी; सात जखमी 

आराम बस पलटी; सात जखमी 

Published On: Aug 19 2018 1:27AM | Last Updated: Aug 19 2018 12:03AMबेळगाव : प्रतिनिधी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी आराम बस पलटी होऊन सातजण जखमी झाले. हा अपघात शनिवारी पहाटे 5 वाजता महामार्गावरील हालगा सुवर्णसौधजवळ कोंडसकोप्प क्रॉसवर झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेे.

गीता दिनेश शेट्टी (वय 48, रा. उडपी), अनिरुद्ध बिधानचंद्र मंडल (26, दोघेही रा. छत्तीसगड), रूपाली गणेश गवळी  (25, रा. निसर्ग कॉलनी, पुणे), गौतमी राजकुमार बुरचुंडी (25, रा. हडपसर-पुणे ) कांती सुंदर (30, रा.पेरदूर ता.कारदोळ,जि.उडपी) वंदना उपेंद्र नाईक  (56, रा.मंगळूर) उळीदय्या बसय्या देसाई (34, रा. अक्कीपेठ, हुबळी) अशी जखमींची नावे आहेत. बागेवाडी पोलिस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन जखमींना मदत केली.