Thu, Feb 21, 2019 11:48होमपेज › Belgaon › ब्राऊन शुगर टोळीतील एका संशयिताचा शोेध

ब्राऊन शुगर टोळीतील एका संशयिताचा शोेध

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 11:50PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी 

बेळगावच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई येथे एका महिलेसह बेळगावच्या 13 जणांना ब्राऊन शुगर विक्री प्रकरणी गुरुवारी अटक केली होती. दरम्यान या प्रकरणातील एक मुख्य आरोपी फरार असून त्याचा बेळगाव पोलिस शोध घेत  आहेत.  पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगावात अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची चर्चा होती. अंमली पदार्थाच्या विक्रीत गुंतलेल्यांवर पोलिसांनी बारीक नजर ठेवली होती. त्यातूनच झालेल्या कारवाई अंतर्गत मुंबई येथून येणार्‍या ब्राऊन शुगर सारख्या पोनी नावाच्या पावडरच्या तस्करीची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून मुंबईच्या एका महिलेसह बेळगावातील तेरा जणांना अटक करण्यात आली.  या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अद्यापही कसून चौकशी केली जात आहे.  आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थाच्या विक्रीत गुंतलेल्या मुंबई येथील एका सूत्रधाराचा बेळगाव पोलिस शोध घेत आहेत. बेळगावातील अंमली पदार्थाची पाळेमुळे शोधून काढण्याचा बेळगाव पोलिस प्रयत्न करीत असल्याचेही लाटकर यांनी स्पष्ट  केले.