होमपेज › Belgaon › बेळगावात भामट्याकडून लाखोंचा गंडा

बेळगावात भामट्याकडून लाखोंचा गंडा

Published On: Dec 13 2017 1:53AM | Last Updated: Dec 13 2017 1:53AM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

उन्नावा  (रा. जि. लखनौ, उ. प्रदेश) येथील शाहिदकमाल अब्दुलरशिद खान याने बेळगावातील शहापूर परिसरात पाच महिने टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे कार्यालय उघडून त्या कार्यालयातून अनेकांना दुबईला नोकरीला पाठविण्याच्या नावावर लाखो रुपये वसूल केले. त्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून शाहिद कमाल बेळगावातून फरार झाला आहे. त्याच्या नावे शहापूर पोलिस ठाण्यात अफझल अबुसाब देशनूर (रा. देवांगनगर, वडगाव) याने तक्रार दिली  आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिदकमाल याने शहापूर येथील गणेशपूर गल्ली येथे 25 ऑगस्ट रोजी कार्यालय सुरू केले. टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या नावावर त्याने या भागातील बेरोजगार युवकांना हेरून त्यांना दुबईत चांगली नोकरी तसेच पासपोर्ट मिळवून देण्याची हमी दिली. यासाठी त्याने 70 ते 80 जणांकडून प्रत्येकी 20 ते 25 हजार रु. गोळा  केले. शाहिदकमालकडे पैसे दिलेल्यांनी  त्याच्याकडे परदेशातील नोकरीसाठी तगादा लावला होता. लवकरच तुम्हाला दुबईला पाठवून देतो असे सांगत त्यांने अनेकांची बोळवण केली होती. आठ दिवसांपूर्वी कार्यालयातील कर्मचार्‍याला गावाला जाऊन येतो, असा निरोप देऊन शाहिदकमाल फरार झाला आहे. पैसे दिलेल्या युवकांनी कार्यालयात जाऊन कर्मचार्‍याकडे पैशासाठी तगादा लावल्यानंतर कर्मचार्‍याने कार्यालयाला कुलूप लावले.