Mon, Aug 19, 2019 15:19



होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍न लवकरच सुटावा ही इच्छा : आ. संजय पाटील

सीमाप्रश्‍न लवकरच सुटावा ही इच्छा : आ. संजय पाटील

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 11:36PM

बुकमार्क करा





बेळगाव ः वाता

सीमाभागातील मराठी भाषा टिकली पाहिजे. यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना मातृभाषेतून किमान चौथीपर्यंत शिक्षण द्यावे. यातून संस्कृतीचे संवर्धन होते. सीमाप्रश्‍न सुटावा, ही माझी इच्छा असल्याचे प्रतिपादन आ. संजय पाटील यांनी केले. व्यासपीठावर सीमाप्रश्‍नाचा ठराव कार्यकर्त्यांनी मांडण्याची घोषणा करताच त्यांनी व्यासपीठ सोडले. 

बेळगुंदीत साहित्यिक विंदा करंदीकर साहित्यनगरीत आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष दिग्दर्शक, नाटककार अभिराम भडकमकर, स्वागताध्यक्ष ज्योती कुमार फगरे, शरद पाटील होते.  सीमाप्रश्‍नी बोलण्यासाठी मला बंधने आहेत. सीमाभागातील मराठी माणसांची इच्छा पूर्ण होवो, ही माझी इच्छा आहे. सीमाप्रश्‍न सुटला नसल्याने मी अडचणीत आलोय. यासाठी हा प्रश्‍न सुटण्याची वाट पाहतोय, असे आ. पाटील म्हणाले.