Tue, Mar 19, 2019 20:54होमपेज › Belgaon › सायकल वितरणामध्ये ‘चिकोडी शैक्षणिक’ ठरले अव्वल

सायकल वितरणामध्ये ‘चिकोडी शैक्षणिक’ ठरले अव्वल

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 8:32PM

बुकमार्क करा

बेळगाव ः महेश पाटील

राज्य सरकार आणि शिक्षण खात्यातर्फे राबविण्यात आलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील सायकल वितरणामध्ये चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात शंभर टक्के सायकलींचे वितरण करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे केवळ 242 सायकलींचे वितरण करणे शिल्लक राहिले आहे. 

चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये अथणी, कागवाड, चिकोडी, निपाणी, हुक्केरी, रायबाग, गोकाक आणि मुरलगी या शैक्षणिक तालुक्यांचा समावेश होतो. या सर्व तालुक्यांमध्ये 33741 विद्यार्थी-विद्यार्थिनींना सायकली पुरविण्यात येणार होत्या. त्यापैकी 33448 विद्यार्थ्यांना सायकलींचा पुरवठा करण्यात आला आहे. केवळ 242 सायकलींचे वितरण शिल्लक आहे. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत उर्वरित सायकलींचेही  वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. 

सध्या परिस्थितीत अथणीमधून 4770, कागवाड 1829, चिकोडी 4071, निपाणी 3438, हुक्केरी 5391, रायबाग 5451, गोकाक 3275 आणि मुडलगी 5223 अशा एकूण 33448 विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले आहे.  यामध्ये अथणी तालुक्यातील 16795 विद्यार्थी आणि 16653 विद्यार्थिंनीचा समावेश आहे. 

ज्या तालुक्यांमध्ये अद्याप सायकलींचे वितरण झालेले नाही. त्यामध्ये अथणी 151, रायबाग 93, मुडलगी 20 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 152 आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 242 अशा एकूण 394 विद्यार्थी-विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करणे शिल्लक आहे.