Thu, Nov 15, 2018 22:23होमपेज › Belgaon › भिडेंच्या सभेला परवानगी नाकारली 

भिडेंच्या सभेला परवानगी नाकारली 

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:50PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी    

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या रविवार दि.14 रोजी बेळगावातील सभेला पोलिस प्रशासनाने कायदा? सुव्यस्थेच्या    कारणावरून परवानगी नाकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरेगाव-भीमा प्रकरणावरून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. यामुळे वातावरण तणावपूर्ण आहे. भीमा?कोरेगाव येथे उसळलेल्या दंगलीवरून संभाजी भिडे यांंच्यावरही  आरोप होत आहेत. भिडे यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी दलित संघटनांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.  पोलिसांनी  परवानगी नाकारल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.