Tue, Nov 19, 2019 10:05होमपेज › Belgaon › वडगाव-शहापुरात पथसंचलन

वडगाव-शहापुरात पथसंचलन

Published On: Dec 24 2017 1:43AM | Last Updated: Dec 23 2017 11:06PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जलद कृती दलाचे शनिवारी शहापूर, खासबाग आणि वडगाव परिसरात पथसंचलन झाले.  शुक्रवारी  बेळगावात दाखल झालेल्या जलदकृती दलाने शुक्रवारी खडग गल्ली परिसरातील पथसंचलन केले होते.   खडक गल्ली दंगलीचे पडसाद इतरत्र उमटण्याची शक्यता गृहित धरून जलदकृती दलाला बेळगावात पाचारण करण्यात आले आहे. आठवडाभर या दलाचे जवान बेळगावात राहतील. आगामी सप्ताहभर जलदकृती दलाचे 200 जवान बेळगावात तळ ठोकून राहणार आहेत. शनिवारी सकाळी शहापूर अळवण गल्ली येथून पथसंचलनाला सुरुवात झाली. पीएसआयसह दोघे   निलंबित 

 सोमवारी रात्री खडकगल्ली व आसपासच्या संवेदनशील परिसरात झालेल्या जातीय तणावाप्रसंगी कर्तव्यात  कसूर करणार्‍या मार्केट पोलिस ठाण्याच्या दोघा पोलिसांवर पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. सोमवारी रात्री झालेल्या खडकगल्ली येथील दंगलप्रकरणी मार्केट पोलिस ठाण्याचे पीएसआय एस. एन. पाटील व हवालदार आय. एस. पाटील यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई झाली आहे.  सीमा लाटकर यांनी त्या दोघाविरोधातील निलंबनाचा आदेश शनिवारी जारी केला. दरम्यान,जेड गल्ली, कचेरी गल्ली, बँक ऑफ इंडिया, होसूर बसवाण गल्ली, पिंपळकट्टा, खासबाग संभाजी रोड, वाली चौक, नवी गल्ली, खासबाग -शहापूर डब्बल रोड, बसवेश्‍वर चौक, वझेगल्ली येथून विष्णू गल्ली येथे पथसंचलनाची सांगता झाली.