होमपेज › Belgaon › एक लाख साड्यांचा गुरुवारी लिलाव

एक लाख साड्यांचा गुरुवारी लिलाव

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:52PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणार्‍या यल्लम्मा रेणुकादेवी व शिखराला अर्पण झालेल्या एक लाख 7 हजार 372 साड्यांचा गुरुवारी लिलाव होणार आहे. यातुन देवस्थानाला 2 कोटी 59 लाख 64 हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.  वर्षभरात 30 लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर दर्शनासाठी येत असतात. वाढत्या भाविकांमुळे मंदिराच्या उत्पादनात भरघोस वाढ होत आहे. देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न 18 कोटीपर्यंत पोहचले आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी 60 लाखांची भर पडते. 

भाविक विविध देणग्या देतात. यामध्ये देवीला सोन्या-चांदीच्या अलंकाराबरोबरच मोठ्या संख्येने साड्या अर्पण केल्या जातात. देणगी रुपाने मिळणारी आभूषणे व साड्यांमधून देवस्थानाला मोठे उत्पन्न मिळते.ठ रावीक काळात देवीला अर्पण झालेली आभूषणे आणि साड्यांचा लिलाव होत असतो. गेल्या दीड वर्षांत भाविकांनी देवीला एकूण 1 लाख 7 हजार 372 साड्या अर्पण केल्या आहेत. यामध्ये मंदिरात देवीला 83 हजार 765 साड्या अर्पण झाल्या आहेत. या साड्यांची किंमत अंदाजे 1, 62, 29, 034 रुपये इतकी आहे. भाविक मंदिराच्या शिखरावर देवीच्या नावाने साड्या अर्पण करत असतात. अशा 23, 607 साड्यांची किंमत अंदाजे 17, 35, 425 रु. आहे. या साड्यांचा गुरुवारी  दि. 14  रोजी लिलाव होणार  आहे.