Wed, May 22, 2019 06:56होमपेज › Belgaon › अंगणवाडी कर्मचार्‍यांचा बुधवारी मोर्चा

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा बुधवारी मोर्चा

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 14 2018 7:54PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी 

अंगणवाडी कर्मचारी आणि सहाय्यक फेडरेशनच्यावतीने विविध मागण्यांसाठी बुधवार दि. 17 रोजी सकाळी 10.30 वा. चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा काढण्यात येणार असून जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.  अंगणवाडी कर्मचार्‍यांना वेतन दरमहा 18 हजार रू. वेतन देण्यात यावे, कर्मचार्‍यांना सरकारी नोकर म्हणून सी व डी वर्गात कायम करावे, निवृत्तीवेतन रू. 3 हजार करावे, अंगणवाडी शिक्षिकांमधूनच सुपरवाझरसाठी बढती देण्यात यावी, मातृपूर्ण योजना बंद करावी आदी अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या आहेत. खानापूरातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी मोर्चासाठी खानापूर येथील आंबेडकर गार्डनजवळ बुधवारी सकाळी 10.30 वा. जमा व्हावे. मोर्चात मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचार्‍यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नागेश सातेरी, मेघा मिठारे, प्रकाश देसाई, फर्जना नाईक, सरिता पाटील आणि भारती पै यांनी केले आहे.