Tue, Mar 19, 2019 11:24होमपेज › Belgaon › अगसगे झाले ‘वाय-फाय’ गाव

अगसगे झाले ‘वाय-फाय’ गाव

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:44PM

बुकमार्क करा

बेळगाव : हिरामणी कंग्राळकर

केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग असलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाला केंद्र सरकारने चालना दिली असून राज्यातील सर्व ग्रा. पं. ना वाय-फायच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.  तालुक्यातील अगसगे ग्रा. पं. ला मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  केंद्र सरकारच्या आयसीटी सोसायटी माहिती तंत्रज्ञान आणि बायोटेक्नॉलॉजी या राज्य सरकारच्या   या संस्थांमार्फत ग्रामीण भागामध्ये वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यात याव्यात.

याबरोबरच सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ नागरिकांना व्हावा. या उद्देशाने वाय-फाय सेवा सुरू करण्यात आली आहे. ग्रा. पं. चा कारभार इंटरनेटच्या माध्यमातून व्हावा, यासाठी केंद्र सरकारने गावागावांत मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली आहे. या माध्यमातून नागरिकांना जमीन उतारे, महसूल भरणा, वीज बिल, पाणी बिल, टेलिफोन बिल भरणे सोयीचे होणार आहे.  रेल्वे, बस तिकीट आरक्षण तसेच जन्म आणि मृत्यू दाखला प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जाणार्‍या सुविधा या माध्यमातून उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. 
राज्यातील 2150 ग्रा.पं. मध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रत्येक गावामध्ये चार ठिकाणी वाय-फाय अँटिना बसविण्यात येणार आहे. अँटिन्याची व्याप्ती 500 मीटर असणार असून या वाय-फायद्वारे सरकारच्या वेबसाईटवरील सुविधांची माहिती गावातील नागरिकांना मिळणार आहे. दिवसाला 100 एमबी इंटरनेट सुविधा असणार आहे. वाय-फाय बसविण्याचे व देखभालीची जबाबदारी सीएससी ई-गर्व्हनन्स इंडिया लिमिटेड या भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाकडे असणार आहे. वाय-फाय सुविधा विकास करण्यासाठी राज्य सरकारबरोबर करार करण्यात आला आहे. यासंदर्भात ग्रा. पं. ना सहकार्य करण्यास सूचित करावे, असे पत्र केंद्र सरकारच्या माहिती विभागाच्या संचालिका सलमा फईम यांनी जि.पं.च्या कार्यकारी अधिकार्‍यांना पाठविले आहे.