Sat, Aug 24, 2019 23:21होमपेज › Belgaon › बेळगावचा तरुण अपघातात ठार

बेळगावचा तरुण अपघातात ठार

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 31 2017 12:37AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

येथील लिंगराज महाविद्यालयामध्ये बीबीएच्या तिसर्‍या सेमिस्टरमध्ये शिकणार्‍या  विद्यार्थ्याचा पुणे येथे अपघातात मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. सागर अनिल महाजन (वय 19, रा.न्यू गुडशेड रोड शास्त्रीनगर, बेळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सागरबरोबर त्याचा केरळीयन मित्रही ठार झाला आहे. प्रोजेक्ट तयार करण्यासाठी सागर 10 डिसेंबरला पुण्याला गेला होता. पुण्याच्या पुणे डिजिटल मीडिया या कंपनीमध्ये तो प्रोजक्ट करत होता. शुक्रवारी रात्री आपल्या मित्रासह तो कंपनीकडून निवासाकडे दुचाकीवरून जात असताना टिप्परने धडक दिली. या दुर्घटनेमध्ये दोघेही जागीच ठार झाले. 

सागरला 6 जानेवारीला महाविद्यालयात प्रोजेक्ट सादर करणे आवश्यक होते. त्याचे काम पूर्ण होत आले होते, अशी माहितीही मिळाली.  सागरचे वडील परदेशात कामाला असल्याने त्याच्या मृत्यूची घटना समजताच ते परत निघाले होते, तर बेळगावातील कुटुंबीयांनी रात्रीच पुण्याकडे धाव घेतली. महाविद्यालयाकडून त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. वडील पुण्याला पोहोचल्यानंतर सोमवारी मृतदेह बेळगावला आणला जाण्याची शक्यता आहे.