बेळगाव : पुढारी ऑनलाईन
घरगुती गॅस सिलंडरच्या स्फोटात महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील गौडगाव येथे गुरुवारी पहाटे ही घटना घडली. सुगंधा दुर्गाप्पा पंगाण्णावर (वय २५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पती दुर्गाप्पा या दुर्घटनेतून बचावले आहेत.
दुर्गाप्पा आणि सुगंधा हे दोघेही चिकलदिनी गावात जत्रेला जाणार होते. त्यासाठी त्यांनी पहाटे लवकर उठून तयारी चालवली होती. दुर्गाप्पा हे पाणी आणण्यासाठी बाहेर गेले असताना सुगंधा हिने गॅस पेटवला. मात्र, गॅस लिकेज असल्याने आणि घराची दारे खिडक्या बंद असल्याने घरात स्फोट झाला. यात सुगंधाचा मृत्यू झाला. तर पती दुर्गाप्पा या दुर्घटनेतून बचावले आहेत.