Wed, Nov 21, 2018 18:38होमपेज › Belgaon › बेळगाव : अपघातात महिला ठार

बेळगाव : अपघातात महिला ठार

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 12:47AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

उद्यमबागमधील बेळगाव-खानापूर रस्त्यावर मजगाव क्रॉसनजीक रस्ता ओलांडणार्‍या महिलेला दुचाकीने धडक दिल्याने सदर महिला ठार झाल्याची घटना सकाळी घडली. या घटनेत अरियन पावलू परेरा (वय 50 रा. हुंचेनहट्टी रोड मच्छे) असे मयत महिलेचे नाव आहे.

मच्छे येथील अरियन या उद्यमबागमधील एका कारखान्यात काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी बसमधून उद्यमबागमधील बसथांब्याजवळ उतरून कारखान्याकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना खानापूरकडून बेळगावकडे निघालेल्या दुचाकीस्वार युवकाला अचानक बस समोरून आलेल्या महिलेचा अंदाज आला नाही. त्यामुळे अरियन यांना जोराची धडक बसून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या जागीच ठार झाल्या. 

दक्षिण विभाग वाहतूक पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक तिम्माप्पा करीकल यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय शवागारात पाठविण्यात आला.