Wed, Jul 17, 2019 07:59होमपेज › Belgaon › नाताळसाठी शहरात बाजारपेठ सजली 

नाताळसाठी शहरात बाजारपेठ सजली 

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 13 2017 9:28PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

25 डिसेंबरला साजर्‍या होणार्‍या नाताळाच्या स्वागतासाठी  बाजारपेठ सज्ज झाली आहे. ख्रिसमससाठीच्या सर्व वस्तूंनी दुकाने खचाखच भरली आहेत. खरेदीसाठी बाजारात गर्दीही वाढली आहे. बाजारात 8 रुपयांपासून 7 हजार रुपयांपर्यंतचे साहित्य दाखल झाले आहे. यामध्ये 7 हजार रुपयांचा बलून मार्च (इंटरेन्स मार्च) आकर्षक आहे. यानिमित्ताने तीनशे पेक्षा अधिक वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. ख्रिश्‍चन बांधव हा सण उत्साहात साजरा करतात. घरावर विद्युत रोषणाई केली जाते. अंगणात ख्रिस्तजन्माचा देखावा केला जातो. नाताळ अकरा दिवसांवर आल्याने लगबग वाढली आहे. नवीन कपड्यांच्या खरेदीसाठीही गर्दी होत आहे. आकर्षक कपडे खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. बच्चे कंपनीचे खास आकर्षक असणार्‍या नाताळाच्या टोप्या विक्रीसाठी दुकानात आल्या आहेत. सजावटीसाठीच्या शोभेच्या वस्तूंचीही रेलचेल आहे. लहान मुलांच्या आग्रहाखातर खरेदी केली जात आहे. 

सणातील मुख्य आकर्षण म्हणजे ख्रिसमस ट्री आणि सांताक्लॉज, बच्चे कंपनीला याच्या वेेशभूषेचे भलतेच आकर्षण असते. या पार्श्‍वभूमीवर ठिकठिकाणी विक्रीसाठी आलेल्या सांताक्लॉजच्या विविध आकार व प्रकारातील टोप्या लक्षवेधी ठरत आहेत. नाताळला कँडल्सचे वेगवेगळे महत्त्व असते. आकर्षक कँडल्स विक्रीसाठी उपलब्ध  आहेत.  बच्चे कंपनीला भेट घेऊन येणार्‍या संताक्लॉजचे विषेश आकर्षण असते. मुलांना देण्यासाठी पालक मोठ्या प्रमाणावर गिफ्ट खरेदी करतात.  यामध्ये विल चिन्स काचेचे, फ्लॉवर पॉट, विविध प्रकारचे चॉकलेट, बेल्स, स्टार्स, ट्री डेकोरेशन, बॅनर्स, लायटिंग, फेंगशुई आयटम, सॅनटायमर यासह विविध वस्तूंची बाजारात चलती आहे. गणपत गल्ली, पांगूळ गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, कॅम्प, टिळकवाडी, शहापूर भागातील दुकांनात ख्रिसमसच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून येते.