होमपेज › Belgaon › सुभाषनगरात घरफोडी  दागिने, रोकड लंपास

सुभाषनगरात घरफोडी  दागिने, रोकड लंपास

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 31 2017 12:35AM

बुकमार्क करा




बेळगाव : प्रतिनिधी

सुभाषनगर दुसरा क्रॉस येथे घरफोडीची घटना घडली आहे. दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यानी तिजोरीतील 100 ग्रॅमचे सोन्या-चांदीचे दागिने व दोन लाखांची रोकड लंपास केली आहे. 
रफिक सनदी यांच्या मालकीचे हे घर आहे. सनदी व त्यांचे कुटुंबीय शुक्रवारी परगावी गेले होते. घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यानी संधी साधली. सनदी हे शनिवारी सकाळी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. मार्केट पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत तपासाचे कार्य सुरू होते.