Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Belgaon › मिरवणुकीने शिवरायांना अभिवादन

मिरवणुकीने शिवरायांना अभिवादन

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 11:26PMबेळगाव  ; प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी उद्यान ते कपिलेश्‍वर मंदिरापर्यंत मिरवणूक, कलापथकांकडून कलांचे सादरीकरण आणि ध्येयमंत्र अशा वातावरण आज महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवाजी उद्यानात शिवजयंती साजरी करण्यात आली.  महापौर संज्योत बांदेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधीवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्येय मंत्र म्हणण्यात आला.

 यावेळी उपमहापौर नागेश मंडोळकर, उपजिल्हाधिकारी डॉ. सुरेश इटनाळ, मनपा आयुक्‍त शशीधर कुरेर, पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर, नगरसेवक पंढरी परब, सरिता पाटील, वैशाली हुलजी, माया कडोलकर, मेघा हळदणकर, संजय शिंदे    आदी उपस्थित होते. नगरसेवकांचा व मान्यवरांचा उद्योजक व काँग्रेस नेते राजेश जाधव यांच्याहस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिवप्रेमी कलाकारांचीही सत्कार करण्यात आला. शिवजयंती सोहळा सरकारी असल्यामुळे लोकसहभाग कमी होता.  बेळगावात पारंपरिक पद्धतीने अक्षय तृतियेला शिवजयंती साजरी केली जाते.