Wed, Jul 24, 2019 12:04होमपेज › Belgaon › अन्नोत्सवाची उत्साहात सांगता

अन्नोत्सवाची उत्साहात सांगता

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 14 2018 11:59PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी  

येथील सीपीएड मैदानावर रोटरी क्लब ऑफ बेलगामतर्फे आयोजित ‘अन्नोत्सव 2018’ ची सांगता अमाप उत्साहात झाली. ‘आफ्रिकन डान्स’ ने सांगता समारंभात मोठी रंगत आणली. रविवार दि. 14 हा दिवस शेवटचा असल्याने खवय्यांसह, खरेदीसाठी आणि मनोरंजनासाठी  बेळगावकरांनी तोबा गर्दी केली होती.  5 जानेवारीपासून सुरू असलेल्या या अन्नोत्सवात देशभरातील विविध ठिकाणांहून विविध उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले होते. सोबतीला दररोज मनोरंजन कार्यक्रम असल्याने हजारो नागरिक भेट देत असत रविवारपर्यंत लाखो लोकांनी या अन्नोत्सवाचा लाभ घेतला. 

विविध कापड उत्पादन कंपन्यांचे, गृहप्रकल्पाचे, खाद्या प्रकल्पांचे, मसाला प्रकल्प, सायकल, दुचाकी, चारचाकी सह सौंदर्यप्रसादनांच्या स्टॉलवरही ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. आयुर्वेदिक उत्पादने, विविध प्रकारची चॉकलेट, सनगॉगल्स स्टॉललाही तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जॉईंट व्हील, सलामबोट, कोलंबस, ब्रेकडान्स, डॅ्रगनट्रेन, मिनीट्रेन, बलून शूटिंग, वॉटरबोर्ड या गेमवर बालचमूंनी अस्वाद घेतला.  काही स्टॉल प्रबोधनात आघाडीवर होते. रोटरीच्या सहकार्याने नेक्षदर्शन आय बँक बेळगाव ने आपल्या स्टॉलद्वारे नेत्रदान चळवळ ही काळाची गरज हे ग्राहकांना पटवून दिले. तर काही स्टॉलद्वारे उच्च शिक्षण व विदेश शिक्षणासाठी सर्व सोपस्काराबाबत माहिती दिली. शुक्रवार दि.  5 ते रविवार दि. 14 पर्यंत अन्नोत्सवाला लाखाहून अधिक ग्राहकांनी भेट दिली.